नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल यानं एकाच डावात सर्व दहा गडी बाद करायची ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एजाज पटेलनं पहिल्या डावात ११९ धावांमध्ये भारताचा सर्व १० गडी बाद केले. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा जीम लेकर आणि भारताचा अनिल कुंबळे यांच्यानंतरचा केवळ तीसराच गोलंदाज ठरला आहे. पहिल्या डावात भारतान ३२५ धावा केल्या आहेत. यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला न्यूझीलंडची भारताच्या गोलंदाजीसमोर घसरण झाली. भारताच्या प्रभावी गोंलदाजी पुढे न्यूझीलंडचा डाव केवळ ६२ धावांवर संपुष्टात आल्या. भारताच्या आर.अश्विननं ४, मोहम्मद सिराज ३, अक्षर पटेल २ आणि जयंत यादव यांनी १ गडी बाद केले. न्यूझीलंडचा संघ २६३ धावांनी पिछाडीवर पडला आहे. त्याआधी आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं कालच्या ४ गडीबाद २२१ धावांवरून आपला डाव पुढे सुरु केला. मात्र एजाज पटेल याच्या फिरकीसमोर ठराविक अंतरानं भारताचे फलंदाज बाद होत गेले. शतकवीर मयांक अगरवालनं अक्षर पटेलसोबत ६७ धावांची भागिदारी करत करत भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. मयांक यानं १५० तर अक्षर पटेलनं ५२ धावा केल्या.