नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिनाअखेरिला नियोजित भारत दौ-याबद्दल आपल्याला उत्सुकता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सद्गगृहस्थ असून, आपले मित्र आहेत, असं ट्रम्प यांनी बातमीदारांना बोलताना सांगितलं.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी आपलं बोलणं झालं असून त्यावेळीच, भारतात लाखो लोक आपल्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं मोदी यांनी आपल्याला सांगितलं, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
येत्या 24 आणि 25 तारखेला ते सपत्नीक येणार असून, अहमदाबाद आणि नवी दिल्लीला जाणार आहे.