पुणे : पुणे विभागातील 4 हजार 799 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 140 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 209 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 441 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 4 हजार 206 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 913 आहे. कोरोनाबाधित एकूण 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 383 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 241, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 41, सांगली जिल्ह्यात 3 कोल्हापूर जिल्ह्यात 68 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 482 कोरोना बाधीत रुग्ण असून 144 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 836 कोरोना बाधीत रुग्ण असून 321 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 436 आहे. कोरोना बाधित एकूण 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 101 रुग्ण असून 55 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 43 आहे. कोरोना बाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 504 कोरोना बाधीत रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 427 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 85 हजार 723 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 80 हजार 520 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 203 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 71 हजार 41 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 9 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
(टिप : – दि.30 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)