नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा भविष्यातला प्रादुर्भाव आणि संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं, कोव्हीड-19-भारतीय राष्ट्रीय सुपर मॉडेल, या नावानं एक प्रारुप तयार केलं आहे.

कोव्हीड फैलावाचा अदमास घेऊन त्यानुसार पुढची आखणी करण्यासाठी, गणिती पद्धतींचा अवलंब, या प्रणालीतून केला जाणार आहे. त्यासाठी, या क्षेत्रातल्या आणि कोरोनासंदर्भातल्या तज्ञांचा सहभाग, या सुपरमॉडेल मध्ये करवून घेतला जाणार आहे.

कोरोनामुक्तीच्या उपाययोजनांसाठी, संपूर्ण देशासाठी सामाईक प्रणाली असावी, हा या सुपरमॉडेल मागचा उद्देश आहे. या प्रणालीच्या माध्यमातून, कोरोनाबाबतच्या आरोग्यविषयक सज्जतेचे  निर्णय घेणं आणि त्या अनुषंगानं, उपाययोजना राबवायला मदत मिळणार आहे.