मुंबई (वृत्तसंस्था) : मुंब्र्यात ठाणे महानगरपालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडा एक हजार बेडचं कोव्हीड रूग्णालय उभारणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल या जागेची पाहणी केली.

भविष्यात कोव्हीड १९ रूग्णांना बेड उपलब्ध व्हावेत यासाठी शहरात ग्लोबल इम्पॅक्ट हब इथं एमएमआऱडीएच्या वतीनं एक हजार बेडचं  कोव्हीड 19 रूग्णालय उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ते रूग्णालय कार्यान्वित होणार आहे. यात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या 500 बेडसह 100 बेडचं आयसीयू युनिट तयार केलं  जाणार आहे.