नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाची समस्या असलेल्या एड्स या रोगा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आज एड्स विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. HIV मूळ असलेल्या या रोगामुळे आजपर्यंत करोडो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबविला आहे. या अंतर्गत प्रतिबंध, चाचणी आणि इलाज अशा तीन स्तरावर या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते.

२०१७ ते २०२४ या सात वर्षांसाठी सरकारनं या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी शाश्वत कार्यक्रमाची आखणी केली आहे. एड्सच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्राकडून राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची संपूर्णपणे केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून अंमलबजावणी केली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्याला बाधा पोचवणार्‍या एड्स या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी तसंच शाश्वत विकासाचं ध्येय गाठ्ण्यासाठी केंद्रानं 2017-2024 या सात वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना आखली आहे.