नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे.

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात या मोहिमेचा प्रारंभ केला. दरमहा 55 रुपये ते 200 रुपये हप्ता भरून या योजनांचं सदस्यत्व घेता येईल, असं त्यांनी सांगितलं.