मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सुमारे ४ हजार अतिरिक्त डॉक्टर लवकरच वैद्यकीय सेवेत दाखल होणार आहेत.

राज्यातल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी २०१९ मधे एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आणि त्यानंतर आपली इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरतं पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी तसे निर्देशही जारी केले आहेत.

या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करता येईल. त्यानंतर ते थेट वैद्यकीय सेवेत दाखल होऊ शकतील.