नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली -अमृतसर एक्सप्रेस वे चा भाग म्हणून नाकोदर ते सुलतानपूर लोधी, गोविंदवाल साहिब, खदूर साहिब मार्गे अमृतसर शहरास नवीन ग्रीनफील्ड मार्ग विकसित करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, अमृतसर ते गुरदासपूर हा रस्तादेखील पूर्ण विकसित केला जाईल व सिग्नलमुक्त केला जाईल. यासह, वाहतुकीस नाकोदरहून, म्हणजेच अमृतसरमार्गे किंवा करतारपूरमार्गे गुरदासपूरला जाण्याचा पर्याय असेल. मंत्री म्हणाले, हे ग्रीनफील्ड संरेखन केवळ अमृतसर शहरालाच नव्हे तर पंजाबमधील सुलतानपूर लोधी, गोइंदवाल साहिब, खदूर साहिब तसेच अलीकडे विकसित झालेल्या डेरा बाबा नानक / करतारपूर साहिब आंतरराष्ट्रीय कॉरिडोरला देखील सर्वात कमी व वैकल्पिक एक्सप्रेस जोडणी देईल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज अमृतसर शहराला नवीन ग्रीनफिल्ड मार्ग विकसित करण्याची घोषणा केली.

या एक्स्प्रेस वेमुळे अमृतसर ते दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरील प्रवास सध्याच्या आठ तासांवरून कमी होऊन चार तास होईल. ते म्हणाले की, यामुळे पंजाबमधील जनतेची दीर्घकालीन मागणी पूर्ण होईल. एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असेल.

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने भारतमाला प्रकल्पांतर्गत दिल्ली अमृतसर कटरा एक्सप्रेस वेचा विकास हाती घेतला आहे. जानेवारी 2019 मध्ये एक्स्प्रेसवेचे संरेखन निश्चित झाले आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अलीकडेच, अमृतसरला एक्सप्रेस वे संरेखित करण्याचा प्रश्न अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल आणि केंदीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला होता. पंजाब सरकारचे खासदार (राज्यसभा) शवेत मलिक, खासदार (लोकसभा) गुरजितसिंग औजला, शीख संघटना आणि इतर लोकप्रतिनिधी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता.

नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे अमृतसरला नवीन मार्ग विकसित करण्याविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

हे निदर्शनास आणले जाऊ शकते कि प्रारंभी जम्मू-काश्मीरने दिल्ली-कटरा एक्सप्रेस वे प्रस्तावित केले होते. तथापि, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि एमएसएमई मंत्री गडकरी यांनी अशी कल्पना केली होती की प्रस्तावित द्रुतगती महामार्ग हा शहराचे धार्मिक महत्त्व पाहता अमृतसर मार्गे जाईल कारण येथे दरवर्षी चार दशलक्ष पर्यटक भेट देतात आणि म्हणूनच भारतमाला अंतर्गत दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेची संकल्पना मांडली.

अमृतसरला संरेखित करण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी व तो सोडविण्यासाठी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल, केंद्रीय (आय / सी) गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, राज्यमंत्री (आरटी अँड एच) जनरल व्हीके सिंग, पंजाब सरकारचे खासदार (राज्यसभा) श्वेत मलिक, गुरजितसिंग औजला, खासदार (लोकसभा) आणि अनिल जोशी, माजी कॅबिनेट मंत्री, अन्य वरिष्ठ अधिकारीही बैठकीस उपस्थित होते.

अमृतसर शहरासाठी नवीन ग्रीनफिल्ड संरेखण विकसित करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीचा व्हिडिओ

असा उल्लेख केला जातो की अमृतसर शहर हा नेहमीच दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्गाचा अविभाज्य भाग होता. ग्रीनफील्ड आणि ब्राउनफिल्ड संरेखन एकत्रित करून दोन टप्प्यात एक्सप्रेस वे प्रस्तावित केला होता.

पंजाब राज्यातील प्रस्तावित द्रुतगती मार्गासाठी भूसंपादन त्वरित करण्यासाठी एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक सहकार्य करण्याविषयी गडकरी यांनी पंजाब सरकारला विनंती केली.