पिंपरी : महात्मा ज्योतिबा फुले यानावा ऐवजी, “महात्मा जोतीराव फुले” हेच नाव “अधिकृतपणे” वापरावे, असा ठराव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिनांक १/६/२०२० रोजी मंजूर करण्यात आला. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, असा ठराव ‘महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत’ मंजूर करणारी, पिंपरी-चिंचवड ही महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महानगरपालिका आहे.

महात्मा जोतीराव फुले हेच नाव अधिकृत असावे, या मागणीचा आपण महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने, गेल्या १ वर्षांपासून पाठपुरावा केला. यासाठी महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, सर्व पक्षाचे नेते, तसेच इतर संबंधित समित्यांचे पदाधिकारी यांना संघटनेच्यावतीने निवेदने दिली, या विषयांसंबंधित कागदपत्रांच्या आधारे सर्वांना हा विषय समाजावून सांगून चर्चा केल्या, वेळोवेळी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटून या मागणीचा पाठपुरावा केला.

“हा ऐतिहासिक निर्णय, आणि हा ऐतिहासिक विजय, मी महात्मा जोतीराव फुलेंच्या चरणी अर्पण करतो”.

तसेच, या लढाईत माझे प्रेरणास्रोत माननीय कॅबिनेट मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, आणि सामाजिक विचारवंत आणि माझे गुरू प्रा. हरी नरके सर हे आहेत.

आपल्याला या ऐतिहासिक यशात मदत करणारे सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व समतासैनिकांचे, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, सर्व राजकीय पक्षांचे नेते, सर्व सन्माननीय नगरसदस्य या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.

अशी माहिती महात्मा फुले समता परिषद पिंपरी-चिंचवड महानगर- कार्यकारिणी अध्यक्ष अँँड. चंद्रशेखर शिवाजी भुजबळ यांनी साप्ताहिक एकच ध्येय यांच्या प्रतिनिधीला दिली.