मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळापासून मुंबईसह राज्यातल्या इतर ठिकाणी सुरक्षेसाठी काम करणाऱ्या तसंच मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
या वादळाचा सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथकांच त्यांनी कौतुक केलंय. सगळ्यांनी सहकार्य केल्यानंच या वादळामुळे निर्माण झालेलं संकट परतवून लावता आलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
या वादळात मरण पावलेल्या दोन जणांविषयी त्यांनी संवेदनाही व्यक्त केली आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात तसंच इतरत्र झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. संकटकाळात महाराष्ट्र एकजूट असल्याचं दिसून आलं असंही मुख्यमंत्रायंनी म्हटलं आहे.