मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार आहे. त्यांना निवारा शिबिरांमधे २ दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतरच घरी जाता येईल.
आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी याबाबतचे निर्देश खबरदारीचा उपाय म्हणून जारी केले आहेत.