नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाला विजय मिळेल, असा अंदाज विविध मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. माय एक्झीट पोल या संस्थेने भाजपा शिवसेना युती महाराष्ट्रात १८१ जागा जिंकेल तर काँग्रेस आघाडीला ८१ आणि इतरांना २६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

टाईम्स नाऊनं महायुतीला २३० तर आघाडीला ४८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. सीएनएन- न्युज १८ यांनी महायुतीला २४३ तर आघाडीला ४१ आणि इतरांना ४ असा अंदाज वर्तवला आहे. एबीपी सी व्होटरनं भाजपाशिवसेना युतीला २०४ जागा तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ६९ जागा आणि इतरांना १५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

हरियाणात एबीपी न्युज सीवोटर न सत्ताधारी भाजपाला ७२ तर काँग्रेसला केवळ ८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला असून टाईम्स नाऊ च्या सर्वेक्षणानुसार भाजपा ७१ आणि काँग्रेस ११ जागा मिळवेल असा अंदाज दिला आहे. सीएनएन ईपसोसनं भाजपाला ७५ तर काँग्रेसला १० जागा मिळतील, असा अंदाज आपल्या निवडणूकोत्तर सर्वेक्षणात व्यक्त केला आहे.