नवी दिल्ली : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त भारतातले विविध देशांचे राजनैतिक प्रमुख अधिकाऱ्यांनी अमृतसर इथल्या सुवर्णमंदीराला भेट दिली. पंजाब सरकार आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या सहकार्यानं भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं ही भेट आयोजित केली आहे.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्त्रबुद्धेही त्यांच्यासोबत असतील. येत्या 12 नोव्हेंबरला गुरुनानक यांची जयंती देशात तसंच संपूर्ण जगात साजरी करण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.