मुंबई : चौथी इंडियन ऑईल डब्ल्युएनसी नौदल अर्ध मॅरेथॉन स्पर्धा 17 नोव्हेंबरला रविवारी मुंबईत होणार आहे.
नौदल दिनानिमित्त नौदलाच्या पश्चिम विभागाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांपैकी ही स्पर्धा असून भारतीय नौदल आणि इंडियन ऑईल यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे.
2016 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबईतली दुसरी मोठी स्पर्धा तर भारतातली ही पाचवी मोठी स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेतल्या नोंदणीकृत स्पर्धकाला टी शर्ट आणि फिनिशर पदक देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेदरम्यान आणि स्पर्धा संपल्यावर स्पर्धकाला आवश्यक ती वैद्यकीय मदत आणि संबंधित बाबी पुरवल्या जातील. प्रत्येक गटातल्या विजेत्याला विशेष कलात्मक पदकाने गौरवण्यात येणार आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा नौदलाकडून सत्कार केला जाईल.
21.1 किलोमीटरची एअरक्राफ्ट कॅरियर रन
10 किलोमीटरची डिस्ट्रॉयर रन
5 किलोमीटरची फ्रिगेट रन अशा तीन विभागात ही स्पर्धा होणार आहे.
सर्व भारतीय नागरिकांसाठी आणि विदेशी नागरिकांसाठीही स्पर्धा खुली आहे. 5 किलोमीटरसाठी बारा वर्ष किमान वयाची अट असून 10 किलोमीटरसाठी 16 वर्ष तर 21 किलोमीटरसाठी 18 वर्ष किमान वयाची अट आहे.
1 सप्टेंबर 2019 ला नोंदणी बंद होईल त्यापूर्वी स्पर्धकांची संख्या पूर्ण झाल्यास त्यावेळी नोंदणी बंद होईल.
नोंदणीसाठीwww.wnc-navyhalfmarathon.com वर लॉग ऑन करता येईल.