नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर आणि मोकळेपणानं चर्चा झाल्याचं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

माणसाच्या सक्षमतेसाठी बॅनर्जी यांची तळमळ स्पष्टपणे दिसून येणारी आहे, त्यांच्या कार्याचा भारताला अभिमान आहे, असं सांगत मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.