मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि त्याबाबतच्या जोखीमीचा अहवाल पाहता, हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उरलेल्या निधीचा यासाठी वापर केला जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.