नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायभूत सुविधा अभियान तसंच ५ हजार १८९ कोटी रूपये किमतीच्या विविध परियोजनाचं उदघाटन झालं. या अभियानामुळे देशाला नवीन ऊर्जा प्राप्त होईल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. आरोग्य वृद्धीसाठी केली जाणारी गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर गुंतवणूक असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. भविष्यात आजारांपासून लवकरात लवकर मुक्तता व्हावी यासाठी छोट्या गावांमध्येही  मुलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं ते म्हणाले. या योजनेत आजारवरचे  उपचार ते क्रिटि केअर अशी  सशक्त साखळी विकसित केली जाणार आहे. त्यासाठी आजरांचे लवकर निदान आंणि उपचारावर भर दिला जाईल असं ते म्हणाले. या अभियान अंतर्गत देशात महामारी संदर्भात संशोधन करणाऱ्या १५ नवय प्रयोगशाळा, ४ नवे विशानू  संशोधन केंद्र सुरु केली जाणार आहेत.