नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी लंडन येथे युके-भारत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या (जेटको) बैठकीला संबोधित केले.

बैठकीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि पेय, आरोग्य निगा आणि डेटा सर्विसेस या क्षेत्रात तीन नवे कार्यकारी गट उभारण्यावर भारत आणि युके यांच्यात सहमती झाली.

ब्रिटीश प्रयोगशाळांमध्ये उदयाला आलेल्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमता कुशल भारतीय मनुष्यबळाकडे असल्याचे गोयल यांनी सांगितले.