मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातल्या सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या उद्यापासून वाढणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपुरात आता १५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

कमी कर्मचारी असलेल्या सरकारी कार्यालयात १५ कर्मचाऱ्यांना कार्यालयात येता येईल. सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस तरी कार्यालयात यावे लागेल. अन्यथा त्यांना पूर्ण आठवड्याची रजा द्यावी लागेल. याशिवाय खासगी कार्यालयांमध्येही १० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. कमी कर्मचारी असलेल्या खासगी कार्यालयांना किमान १० कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवता येईल.