नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी यांनी ही माहिती दिली आहे. जगभरातल्या २३९ शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

हवेतून पसरणारा संसर्ग दीर्घकाळ हवेत टिकून राहत नाही. त्यामुळं मास्क वापरणं आणि एकमेकांपासून १ मीटरचं अंतर ठेवणं कायम ठेवावं असं वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सी.एस.आय.आर.चे महासंचालक शेखर मांडे यांनी सांगितलं आहे.