नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये अन्न सुरक्षेच्या क्रमवारीत राज्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. FSSAI अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. मोठ्या राज्यांच्या यादीत पहिला क्रमांक गुजरात आणि दुसरा क्रमांक तामिळनाडूनं लावला आहे.

खाद्य चाचणी सुविधा, नियमांचं पालन, ग्राहक जागरुकता, मनुष्यबळ आणि प्रशिक्षण यासारख्या ५ निकषांवर वर्षभर केलेल्या पाहणीतून हे क्रमांक काढण्यात आले आहेत. छोट्या राज्यांमध्ये पहिले ३ क्रमांक गोवा, मणिपूर आणि मेघालयाने पटकावले. केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड, दिल्ली आणि अंदमान पहिल्या तीन क्रमांकावर आहे.