नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील खासगी रुग्णालयांमधल्या खाटांचं वितरण, रुग्णांना अधिक प्रभावीपणे व्हावं, तसच रुग्णालयांची व्यवस्था अधिकाधिक परिणामकारक व्हावी, याकरता ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनानं केली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्कं आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे होण्यासाठी, महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातल्या प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे.

खासगी रुग्णालय विषयक तक्रार करण्यासाठी, ‘ई-मेल’द्वारे सनदी अधिकाऱ्यांकडे थेट तक्रारीचा पर्याय देखील, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, कॉनवेस्ट, मंजुळा एस बदानी जैन रुग्णालय आणि एस.आर.सी.सी, या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 अजित पाटील यांच्याकडे मसिना, वोक्हार्ट, प्रिन्स अली खान , ग्लोबल , के जे सोमय्या, गुरू नानक इ आणि पी डी हिंदुजा, या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा , लीलावती , होली फॅमिली, सेव्हन हिल्स (रिलायन्स), बी.एस.इ.एस, सुश्रुषा आणि होली स्पिरिट, या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर, हिन्दू सभा , एस आर व्ही चेंबूर , गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी, एल एच हिरानंदानी, सुराणा सेठिया आणि फोर्टीस या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा , कोकिळाबेन , संजीवनी , नानावटी, अपेक्स आणि अपेक्स सुपरस्पेशलिटी, या रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.