नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगण-कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग,तसच बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ओदिशाच्या काही भागात, नैऋत्य मोसमी पावसाची पुढची वाटचाल होण्यासाठी,येत्या दोन दिवसात परिस्थिती अनुकूल होईल, असंहवामान विभागानं म्हटलं आहे.
कोकणात उद्या बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भआणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, पुणे वेधशाळेनंवर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून, हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असही वेधशाळेनं म्हटलं आहे.