नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्त झालेल्या क्रीडापटूना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक नवीन धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी म्हटले आहे. फिक्कीने आयोजित केलेल्या दहाव्या जागतिक क्रीडा परिषदेमध्ये ते काल बोलत होते.

देशातल्या क्रीडा संस्कृतीला नवा आकार देण्यसाठी तसेच निवृत्त खेळाडूंना उत्पन्नाचे साधन मिळावे या हेतूने देशभरात १ हजार खेलो इंडिया लघु केंद्रांची स्थापन करण्यात येणार असल्याचे रीजीजू म्हणाले.

क्रीडा स्नेही समाज तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी उद्योजक, व्यावसायिक आणि कंपन्यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.