नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगडातल्या नागरिकांना केरोसिनचे मोफत वाटप केले जाणार आहे. या वादळाचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनीही तशी मागणी केल्यास त्यांनाही मोफत केरोसिन दिले जाईल असं अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.
पूर्णपणे वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या नागरिकांनी मोफत केरोसिनची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूंब म्हणून निश्चित केलेल्या कुटुंबांनाच केरोसिनचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. शिधापत्रिका धारकांना प्रती कुटुंब ५ लिटर केरोसिन दिले जाणार आहे.