युव्हीसी प्रकाशाद्वारे कोरडे आणि रासायनिक-मुक्त जलद निर्जंतुकीकरण

विषाणू-प्रवण वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी युव्हीसी प्रकाश सर्वाधिक परिचित पद्धत

नवी दिल्ली : चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्रीसाठी आंतरराष्ट्रीय प्रगत संशोधन केंद्र (एआरसीआय), भारत सरकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (डीएसटी) विभागाचे स्वायत्त संशोधन आणि विकास केंद्र आणि मेकीन्स उद्योग यांनी, कोविड-19 मुळे होणारा पृष्ठभागांवरील दुषितपणा टाळण्यासाठी रुग्णालयातील अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तू, प्रयोगशाळेमधील पोशाख आणि संशोधन प्रयोगशाळांमधील पीपीईच्या निर्जंतुकीकरणासाठी युव्हीसी आधारित निर्जंतुकीकरण कॅबिनेट (खणाचे कपाट) विकसित केले आहे.

याचा वापर व्यावसायिक आस्थापनांमध्ये आणि बऱ्याच देशांतर्गत वस्तूंमध्ये ग्राहकांना दाखविलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्वांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लॉकडाऊनच्या पहिल्या काही टप्प्यामध्येच सार्स कोव्ह 2 विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 च्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात भारताला यश मिळाले. परंतु, लॉकडाऊन शिथिल झाल्याने, देशभर होणाऱ्या लोकांच्या हालचालीमुळे रोगाचा प्रसार हळूहळू होण्याची आणि काही काळ हे असेच सुरू राहण्याची शक्यता आहे. पृष्ठभाग दुषित होण्यामुळे होणारा विषाणूचा प्रसार ही एक अनपेक्षिक जोखीम आहे ज्यामध्ये सामान्य उपयुक्तता महत्वपूर्ण भूमिका बजावतात.

 कोरड्या आणि रासायनिक-मुक्त जलद निर्जंतुकीकरणाद्वारे यूव्हीसी प्रकाशाद्वारे या संक्रमणाचा सामना करणे हा एक उत्तम मार्ग आहे.  254 एनएमसह युव्हीसी किरण कोविड-19 च्या आरएनए भागाद्वारे जोरदारपणे शोषले जाते, ज्यामुळे फोटो डायमेरायझेशन प्रक्रियेद्वारे आण्विक संरचनात्मक नुकसान होते आणि त्यामुळे ते निष्क्रिय होते. स्टेथोस्कोप, रक्तदाब मोजण्याचे उपकरण, रुग्णांची काळजी घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, मोबाईल फोन, पाकीट, लॅपटॉप्स, पुन्हा वापरण्यायोग्य प्रयोगशाळेतील हातमोजे, प्रयोगशाळेतील कोट्स, सूक्ष्म नलिका, छोट्या मोजमापाची उपकरणे, कागदपत्रे यासह विषाणू-प्रवण वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्याच्या पद्धतींमध्ये यूव्हीसी प्रकाश सर्वाधिक परिचित आहे. निर्जंतुकीकरणाची मात्रा दूषित पृष्ठभागाद्वारे प्राप्त केलेल्या यूव्हीसी डोसच्या प्रमाणात असते, म्हणूनच सर्वोत्तम निकाल मिळण्यासाठी योग्य अभियांत्रिकीसह युव्हीसी प्रणालीची रचना करणे फार महत्वाचे आहे.

“लॉकडाउननंतरच्या काळात विषाणू संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी रिक्त स्थान, पृष्ठभाग आणि विविध वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी रणनीती, तंत्रज्ञान आणि उत्पादने अधिक महत्वपूर्ण आहेत. अतिनील प्रकाश, थर्मल उपचार आणि स्वीकार्य बिगैर-क्लोरीन आधारित जंतुनाशकांच्या एरोसोल मिस्टवर आधारित साधे, सुरक्षित आणि किफायतशीर उपायांचा सेवेत वेगाने समावेश करून घेतला जाईल”, असे डीएसटीचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी सांगितले.

एआरसीआय आणि हैदराबादची कंपनी मेकीन्स यांनी एकत्रितपणे सुटसुटीत युव्हीसी निर्जंतुकीकरण कॅबिनेट (खणाचे कपाट) विकसित केले आहे, ज्यामध्ये 30 डब्ल्यूचे 4 युव्हीसी दिवे (बाजूला) आणि 15 डब्ल्यूचे 2 दिवे (वर आणि खाली) आहेत. सर्व बाजूंनी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी मेटल ग्रील्ड फ्रेम्सद्वारे विभक्त केलेल्या शेल्फमध्ये ठेवलेल्या विविध आकाराच्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी तो एक प्रवाह पुरवितो. सुरक्षिततेच्या विचार करून आणि वापरकर्ता यूव्हीसी प्रकाशाच्या थेट संपर्कात येऊन नये यासाठी जेव्हा दरवाजा संपूर्ण बंद केला जातो (लॉक) तेव्हाच दिवे चालू होतात. सर्व ठेवलेल्या वस्तूंचे 10 मिनिटात निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुरेसे किरण प्राप्त व्हये यासाठी किरणांची तीव्रता पेटीतील विविध बिंदूंवर मोजली जाते. कॅबिनेटचे विभाजन करण्यासाठी केलेल्या चौकटी काढल्या जाऊ शकतात जेणेकरून आवश्यकतेनुसार लॅब कोट, ब्लेझर, सुट  यासारख्या मोठ्या वस्तू देखील निर्जंतुकीकरण केल्या जाऊ शकतात. यूव्हीसी कॅबिनेट बहु-कार्यात्मक असून संशोधन व शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कार्यालये, रुग्णालये, दवाखाने, नर्सिंग होम, हॉटेल, उपहारगृह, व्यावसायिक दुकान आणि कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात स्थानिक वापरासह आस्थापनांसाठी अत्यंत आशादायक आहे.