मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या धारावी भागात गेल्या आठवडाभरात कोरोनामुळं एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. याठिकाणी आढळून येत असलेल्या रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होते आहे. १ जूनला धारावीत ३४ नवे रुग्ण आढळून आले होते. तर काल केवळ १३ नवे रुग्ण आढळून आले. धारावीमध्ये कालपर्यंतची कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ९१२ इतकी आहे, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
महापालिकेचे आरोग्य सेवक, खासगी डॉक्टर, मोबाईल व्हॅन या माध्यमातून ताप , ऑक्सिजन ची कमी पातळी आणि अन्य लक्षणं या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या करून रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आलं. त्यामुळं कोविड-१९ च्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.