मुंबई (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आज कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या किमान ५ आस्थापनांवर छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
कॉक्स अँड किंग्ज ने येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जं घेतली असून त्याची रक्कम जवळपास २ हजार २६० कोटी असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. कंपनीच्या मुंबईतल्या ५ कार्यालयांवर छापे टाकून दस्तएवज गोळा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
संचालनालयाने येस बँक घोटाळ्यात माजी संचालक संस्थापक राणा कपूर यांना अटक करुन त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे.