मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रोगप्रतिकारक  शक्ती  वाढवणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करणाऱ्या आशा वर्करबरोबर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी  कोल्हापूर जिल्हयातल्या करवीर तालुक्यातल्या खाटांगळे इथल्या एकाच कुटुंबातल्या चार व्यक्तीविरोधात आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आयुष मंत्रालयानं शिफारस केलेल्या गोळ्यांचं  वाटप  ५० वर्षांवरील लाभार्थी व्यक्तीनां केलं जात आहे. मात्र आपल्या कुटुंबाला या गोळ्या दिल्या नसल्याचा राग आल्यानं वैशाली पाटील, कृष्णात पाटील,एकनाथ पाटील आणि  पंडित पाटील यांनी संबंधित आशा वर्करला मारहाण केली.