नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल आणखी २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ८८ हजार ५२८ झाली आहे. तर काल या आजारानं १०९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तीन हजार १६९ जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यभरात एक हजार ६६१ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४० हजार ९७५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
मुंबईत काल आणखी १ हजार ३११ नवे रुग्ण सापडले, त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५० हजाराचा टप्पा पार करुन, ५० हजार ८५ वर पोचली आहे. काल ६४ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं कोरोनाबळींची एकूण संख्या १ हजार ७०२ झाली आहे. काल आणखी ८४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले, त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २२ हजार ३८ वर पोचली. सध्या २६ हजार १२५ रुग्ण उपचार घेत आहेत.