मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या क्राफर्ड मार्केटच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्याला आग लागली असून अग्निशमन दलाचे 10 फायर इंजीन घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचं काम सुरु आहे.

या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितलं. मात्र आगीत मार्केटच नुकसान झालंय. हे जुने आणि ब्रिटिशकालीन मार्केट आहे.