नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालना तालुक्यातून नेपाळ इथ यात्रेसाठी गेलेल्या ४० जणांना यात्रा अर्धवट सोडून परत यावे लागलं. जालना तालुक्यातल्या सिरसवाडी गावातून, खरपुडीतून, हिवरा रोषणगाव, इंदेवाडी आणि जालना शहरातून एकूण ४० जण रेल्वेने नेपाळला यात्रेसाठी गेले होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे शेवटचे दोन दिवस त्यांना यात्रा आटोपती घ्यावी लागली.

तेथील प्रशासनानं त्यांना परत पाठवले आहे. आज जालन्यात परतलेल्या या प्रवाशांची जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली.

सर्व प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईचे शिक्के मारण्यात आले असून, पुढील १४ दिवस त्यांना आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.