पिंपरी : स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरीअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्लास्टीक बंदी जनजागृती, श्रमदान व प्लास्टीक मुक्त दिवाळी उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार शहरात ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान स्वच्छता हि सेवा मोहिम राबविणार आहे.
शहरात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्किच्या वस्तु उदा. ताट, वाटी चमचे, भांडी, कप ग्लास, स्ट्रॉ, हॉटेल्स मधुन अन्नपदार्थाच्या पॅकेजींगसाठी वापरले जाणारे लहान मोठे कंटेनर्स, सर्व प्रकारच्या प्लास्टिक बॅग्ज इ. वर बंदी आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी मा. पंतप्रधानांनी राष्ट्राला उददेशून केलेल्या भाषणात देशभरातील नागरिकांना अशा एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर थांबवविण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोंबर २०१९ रोजी १५० व्या जयंतीच्या निमित्त स्वच्छता हि सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.
शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक, व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये प्लास्टिक आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असून, कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. पहिला गुन्हा रु. ५०००/- दंड, दुसरा गुन्हा र.रु १००००/- दंड व तिसरा गुन्हा यांस र.रु २५०००/- दंड व तीन महिने इतक्या मुदतीची कारावास असा दंड आहे.
तरी व्यक्ती, संघटना, संस्था, शाळा, क्रिडा संकुल, क्लब्स, चित्रपट व नाटयगृहे, औदयोगिक संस्था, हॉल, कार्यालये, धार्मिक संस्था, हॉटेल, दुकानदार, मॉल्स, विक्रेता, केटरर्स, व्यापारी, फेरीवाला, वितरक, वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादक, इ.ना आवाहन करण्यात येत आहे की, बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टीक व थर्माकॉल इ. वस्तु, पेट बाटल्या यांचे संकलन करुन सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागात अथवा २ ऑक्टोंबर २०१९ रोजी क्षेत्रीय कार्यालय व त्यांच्या संकलन केंद्रात जमा कराव्यात. बंदी घातलेले प्लास्टीक /प्लास्टीक वेष्टन प्लास्टिक व थर्माकोलचा वापर इ. आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असून नागरिकांनी प्लास्टीकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे.