नोव्हेल शिक्षण संस्थेत शिक्षक दिन साजरा
पिंपरी : समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण देऊन सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचा प्रयत्न सदैव शिक्षक करीत असतात. त्यामुळे राष्ट्र उभारणी आणि राष्ट्राच्या उन्नतीमध्ये शिक्षकांचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिले आहे, असे प्रतिपादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) श्री. अमित गोरखे यांनी केले.
 
पिंपरी चिंचवड येथील नॉव्हेल ग्रुप ऑफ इंस्टीट्युटच्या वतीने ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, तसेच राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) श्री अमित गोरखे यांनी संस्थेतील शिक्षक वर्गाला शुभेच्छा देत त्यांचे सत्कार केले. तसेच, नॉव्हेल ग्रुप ऑफ इंस्टीट्युटच्या सर्व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळेच्या प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे, शाळेच्या विश्वस्थ डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक व्यवस्थापक समीर जेऊरकर, तसेच नॉव्हेल ग्रुप ऑफ इंस्टीट्युटचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
अमित गोरखे  म्हणाले की, शिक्षक हे शालेय शिक्षणा पासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत असे विद्यार्थी घडवित असतात. त्यांची शिकवण आणि आदर्श समोर ठेवत अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. उतुंग यश मिळवत असतात. त्यामुळे हेच शिक्षक देशाच्या प्रगतीचे आणि विकासाचे आधारस्तंभ बनतात.  नॉव्हेल ग्रुप ऑफ इंस्टीट्युटच्या माध्यमातून देखील सर्व शिक्षकांनी अधिकाअधिक चांगले काम करून समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी घडविण्याचे काम करावे, असे आवाहन अमित गोरखे यांनी केले.