नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध शिक्षण संस्थांची पहिली दोनशे मानांकनं आज केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केली. पहिल्या दोनशे शिक्षण संस्थांमधे राज्यातल्या १७ संस्थांचा समावेश असून त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.

या यादीत ६१ पूर्णांक १३ शतांश गुण मिळवून सर्वसाधारण यादीत विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे. विद्यापीठांच्या मानांकनांमधे त्याखालोखाल मुंबई आणि नंतर औरंगाबादच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा क्रमांक लागतो.

याखेरीज मुंबईची रसायन तंत्रज्ञान संस्था, होमीभाभा तंत्रज्ञान संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संशोधन संस्था यांचाही यादीत समावेश आहे.