नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. यामुळे कृषी क्षेत्रातली समृद्धी वृद्धिंगत होऊन देश अधिक स्वावलंबी आणि प्रगत होईल असंही ते म्हणाले.
मेरठच्या चौधरी चरणसिंह विद्यापीठानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनार आणि जुनागड कृषी विद्यापीठानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनारला ते संबोधित करत होते. यावेळी तोमर यांनी कृषी समस्या सोडविण्यात आणि उत्पन्न वाढविण्यात योगदान देण्याचं वैज्ञानिकांना आवाहन केलं आहे.