नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मुंबईत सार्वजनिक क्षेत्रातल्या १२ बँकांच्या वार्षिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी Enhanced Access and Service Excellence अर्थात ईज 3.0 या अहवालाचेही अनावरण केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना त्यांनी ईज ३.० पुरस्कारही प्रदान केले. कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँकेला चांगल्या आणि स्मार्ट बँकींगसाठी हे पुरस्कार अर्थमंत्र्यांनी प्रदान केले. ईज ४.० चे अनावरण देखील त्यांनी केलं. याद्वारे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये सुधारणा लागू केल्या जाणार आहे. निर्यात प्रोत्साहन संस्थांशी आणि उद्योजकांच्या संस्थांनी संपर्क साधून त्यांच्या गरजा वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश बँकांना दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योन्मुख क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन बँकांनी त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.