नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येत्या शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या ऑनलाईन बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. भारत-चीन सीमा भागातल्या स्थितीबीबत प्रधानमंत्री या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

गलवान खोऱ्यात चीनी लष्कराशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आदरांजली वाहिली आहे. सैनिकांचे प्राण गमावणं वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे, असं ट्वीट त्यांनी केलंय.

या सैनिकांनी कर्तव्य बजावताना अत्युच्च धैर्य आणि शौर्याचं प्रदर्शन करत प्राणांचं बलिदान केलं आणि भारतीय लष्कराची उच्च परंपरा कायम राखली, देश त्यांचा पराक्रम आणि त्याग कधीही विसरणार नाही, आपल्या भावना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत, असं सिंग यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या साहस आणि शौर्याचा देशाला अभिमान असून या कठीण समयी सारा देश त्यांच्यासोबत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.