नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यातं काम युद्ध पातळीवर सुरु असून, नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. ते या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधे बोलत होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचे काम सुरु झाले आहे. खऱ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ आणि योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर काम चालू ठेवावं.
नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याबाबतचा शासन निर्णय आजच जारी करुन वाटप तात्काळ सुरु केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कोकणातल्या फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. या फळबागा वाचवण्यासाठी निश्चित असे धोरण लवकरच आखलं जाईल, असे ते म्हणाले.