नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड बाधित रुग्णांना झालेल्या न्यूमोनियावर सौम्य किरणोत्सर्गाचा उपचार होण्याची शक्यता पडताळण्यासाठी नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत अभ्यास चालू आहे.

ऑक्सिजनवर असणाऱ्या दोन रूग्णांवर गेल्या शनिवारी सौम्य किरणोत्सर्गाचा वापर केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आहे, असं संस्थेच्या किरणोत्सार विभागाचे प्रमुख डॉ डी एन शर्मा यांनी सांगितलं.

यावर अधिक अभ्यास सुरू असून आणखी काही रुग्णांना किरणोत्सर्गाचा फायदा झाल्याचं सिद्ध झाल्यास कोविडमुळे होणाऱ्या न्यूमोनियाच्या  गंभीर रूग्णांना हा उपचार उपलब्ध करुन दिला जाईल असंही ते म्हणाले.