नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आले.

नीती आयोगात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी रूद्राक्षाच्या रोपट्याची लागवड केली. यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय आणि सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 1 जुलै 2019 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव मोहीम -2019’चे उद्घाटन केले होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदन व नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 12 जुलै 2019 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तथा वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर तसेच राज्यातील खासदारांनी यात सक्रिय सहभाग घेतला होता.