नवी दिल्ली : देशातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या सर्व टोल प्लाझांच्या सर्व मार्गिका यावर्षी 1 डिसेंबरपासून फास्टॅग म्हणून जाहीर करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. कायद्यानुसार फास्टॅग मार्गिका ही केवळ फास्टॅग वापरकर्त्यांसाठीच राखीव आहे. याखेरीज फास्टॅग वापरकर्ता नसलेला चालक या मार्गिकेतून गेल्यास दुप्पट शुल्‍क आकारणी करण्याची तरतूद या कायद्यात आहेत.

या नियमांचे कठोर पालन होईल, याची काळजी घेण्याचे निर्देश मंत्रालयाने एका पत्राद्वारे एनएचएआयला दिले.

प्रत्येक टोलप्लाझावर जड वाहनांसाठी एक मिश्र मार्गिका ठेवली जाईल. येथे फास्टॅग आणि इतर माध्यमांद्वारे टोल स्वीकारला जाईल.

टोलप्लाझांवर जलद भरणा होऊन वाहतूक कोंडी टाळली जावी, यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.