नवी दिल्ली : रेल्वेशी संबंधित कंपनीनं चीनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट काल रद्द केलं. या निर्णयाचा सध्या सीमेवर सुरू असलेल्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. या कंपन्यांचा कामगिरी चांगली नव्हती म्हणून त्यांचं कंत्राट रद्द केल्याचं असं ते म्हणाले. पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे.

केवळ देशातच निर्मिती केलेल्या वस्तूंचा वापर करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यामुळे आयात केलेल्या वस्तूंचा वापर शून्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चीनमधील उत्पादकांवर बंदी लादण्याचा रेल्वेचा विचार आहे काय असा प्रश्न विचारल्यावर रेल्वेत निविदा प्रक्रियेत प्रामुख्यानं देशांतर्गंत उत्पादकांना परवानगी दिली जाते असे ते म्हणाले. रेल्वेने तयार केलेली उत्पादनं निर्यात करण्याचाही मानस असल्याचं ते म्हणाले.