मुंबई : जगातील अनेक भागात कोरोना विषाणूच्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले प्रमाण आणि मागणीत सुरु असलेली घट यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती बुधवारी १.०९ टक्क्यांनी घसरून ३८ डॉलर प्रति बॅरलवर आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. यासह यूएस क्रूड इन्व्हेंटरीची पातळी १.२ बॅरल्सनी वाढली. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) तेलाच्या मागणीत दररोज ९१.७ मिलियन बॅरल (BPD)ने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला. मे २०२० मधील प्रस्तावित ५००,००० बॅरल प्रतिदिन मागणीपेक्षा ती जास्त आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरण्याला मर्यादा आल्या.
सोन्याच्या किंमती थोड्या म्हणजेच ०.०४%नी घसरून १७२७ डॉलर प्रति औसांवर स्थिरावल्या. अमेरिकी डॉलरचे मूल्य विशेषत्वाने वाढत असल्याने इतर चलनधारकांना पिवळा धातू महाग ठरला. असे असले तरीही, अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी पुढील काही महिने व्याजदरातील कपात कायम राहिल, अशी घोषणा केल्यानंतर सोन्याच्या किंमतीतील घसरणीला मर्यादा आल्या.
बँक ऑफ जपानने प्रोत्साहनपर आणि मदत करण्यासाठी १ ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेज जाहीर केल्यामुळेही सोन्याच्या किंमतीतील घसरण मर्यादित राहिली. यासोबतच कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत विशेषत: चीनमधील रुग्णांमध्ये वाढ झाल्याने किंमतींना प्रोत्साहन मिळाले.
स्पॉट सिल्व्हरच्या किंमती १.०६% नी वृद्धी घेत १७.६ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमती ०.२२% नी वाढून ४८,४३६ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.