मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र त्यानां ओबीसी समाज्यातलं आरक्षण द्यायला आमचा विरोध राहील, असं माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल सांगली इथं ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात आरक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. आमचं आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव आखला जातोय, अशी टीका त्यांनी केली. राज्यात सर्व ७५ टक्के नोकर भरत्या थांबल्या आहेत. ओबीसींच्या नोकऱ्यांच्या हक्कावर गदा आणली जात आहे.
१३ टक्के मराठा बांधवांसाठी ८७ टक्के एस सी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातल्या बांधवांचे हाल सुरू आहेत असंही ते म्हणाले.