विभागात कोरोना बाधित 18 हजार 532 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 हजार 532 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 213 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 791 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 340 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.21 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.27 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 14 हजार 725 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 9 हजार 2 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 159 आहे. कोरोनाबाधित एकूण 564 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 320 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.13 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.83 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 603 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात477 , सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 100, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 02 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 800 रुग्ण असून 613 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 148 आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 2 हजार 5 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 79 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 754 आहे. कोरोना बाधित एकूण 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 271 कोरोना बाधीत रुग्ण असून 160 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 103 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 731 रुग्ण असून 674 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 49 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 33 हजार 282 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 30 हजार 995 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 287 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 12 हजार 162 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 18 हजार 532 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 20 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )