नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूत कठुआ जिल्ह्यातल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पानसर चौकीजवळ आकाशात घिरट्या घालणारं पाकिस्तानचं ड्रोन, भारताच्या सीमा सुरक्षा दलानं आज पहाटे पाडलं. हे ड्रोन भारताच्या हद्दीत २५० मीटर अंतरापर्यंत घिरट्या घालत होतं अशी माहिती सीमा सुरक्षा दलानं दिली.

या ड्रोन मधून आठ बॉम्ब, एक अमेरिकी बनावटीची रायफल आणि बुलेट-प्रुफ जाकीट नाही भेदू शकतील अशा पोलादी पुंगळ्या, असा शस्त्रसाठाही, सीमा सुरक्षा दलानं या ड्रोन मधून हस्तगत केला.