नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमधल्या संपूर्ण गलवान खोऱ्यावर चीन हक्क सांगत आहे, त्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आज याबाबत सांगितलं की भारतानं याआधीच चीनचा गलवानवरच्या हक्काचा दावा फेटाळून लावत, चीननं या भागातल्या कारवाया आवराव्यात असं सांगितलं होतं.

मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपला दावा कालही कायम ठेवला होता. आजही या भागातल्या चकमकीबाबत चीन भारतावरच ठपका ठेवत असून संपूर्ण गलवान खोऱ्यावर दावा सांगत आहे. भारत सरकार हा दावा फेटाळून लावणार आहे का सरकारनं यावर उद्याची वाट न पाहता आजच उत्तर दिलं पाहिजे, असं चिदंबरम म्हणाले.