नवी दिल्ली : कारगिल युद्धाच्या ‘ऑपरेशन विजय’च्या विसाव्या वर्षानिमित्त, लष्करी आणि निमलष्करी दलातल्या सर्व तुकड्यांमध्ये विजयी उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त, ह्या विजयात मोठे योगदान असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या पथकांनीही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

कारगिल विजय दिवस संपूर्ण देशासाठीच अभिमानाचा दिवस असतो.देशासाठी प्राण दिलेल्या हुताम्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आणि देशाच्या सुरक्षेसाठी लष्करी दले अधिक सामर्थ्यवान करण्याचा निश्चय करणारा हा दिवस! ह्या दिवसानिमित्त सीमा सुरक्षा दलही अनेकविध कार्यक्रम करणार आहे.

ह्या साप्ताहिक कार्यक्रमांची रूपरेषा आणि यादी अशी:-

  • सीमारेषेवर राहणाऱ्या सर्व हुतात्मा आणि पराक्रमानिमित्त पदके मिळवणाऱ्या जवानांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांचा सत्कार
  • प्राथमिक शाळांसाठी चित्रकला आणि देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा
  • माध्यमिक शाळांसाठी देशभक्तीपार विषयांसाठीच्या वादविवाद स्पर्धा
  • देशभक्तीपर घोषणाविषयक मुक्त स्पर्धा.
  • प्रभात फेरी/सायकल रैली
  • हुताम्यांसाठी दौड ह्या पाच मीटर धावस्पर्धेचे आयोजन.
  • शस्त्रास्त्र प्रदर्शनी
  • ह्या युद्धात सीमासुरक्षा दलाच्यां जवानांनी केलेल्या कामाची माहिती सांगणारे विडीओ आणि फोटो प्रदर्शनी.
  • ‘नो युवर फोर्स’ही मोहीम जाणून घेण्यासाठी मुलांची इथे भेट घेणे/
  • राजस्थानमध्ये उंट सफारी
  • रक्तदान शिबीर ‘
  • तरुण मुलांना संरक्षण दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्याख्याने आयोजित करणे.

सीमा सुरक्षा दल सीमेवर राहणाऱ्या सर्व नागरिकांपर्यत पोह्चून देशाच्या सुरक्षा आणि राष्ट्रबांधणीत सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाची माहिती जनतेपर्यत पोचवणार आहे. कारगिलची विजय गाथा पुन्हा सांगणार आहे.